info@shreeyanshlegal.com
+91-9920963730 / +91-9920963737

फ्लॅटधारकांनो जमिनीचे मालक व्हा!

‘कन्व्हेंस डीड’ करा!नाहीतर देशोधडीला लागाल

फ्लॅटधारकांनो जमिनीचे मालक व्हा! ‘कन्व्हेंस डीड’ करा!नाहीतर देशोधडीला लागाल

 

फ्लॅटधारकांनो जमिनीचे मालक व्हा! ‘कन्व्हेंस डीड’ करा!
नाहीतर देशोधडीला लागाल!
गोरेगाव पूर्व येथील तीन मजली इमारत काही वर्षांपूर्वी कोसळली होती. त्यातील बिऱ्हाडे उघड्यावर पडली. यामुळे त्यांनी बिल्डरकडे इमारत पुन्हा बांधून देण्याची मागणी केली. पण बिल्डरने साफ नकार दिला. 
त्यामुळे रहिवाशांनी बिल्डरने फसवणूक केल्याचा दावा करीत ग्राहक न्यायालयात धाव घेतली. पण ग्राहक न्यायालयात सुनावणीचेवेळी या इमारतीसंदर्भात ‘कन्व्हेंस डीड’चा विषय समोर आला. सोसायटी व जमीन मालक यांच्यात असा करारच झालेला नाही. त्यामुळे इमारत कोसळल्यानंतर सर्व जमिनीची मालकी ही परत त्या बिल्डरकडेच अल्याचे दिसून आले. कारण बिल्डर ने जमिनी वरील फ्लॅट करार करून दिले होते पण जमीन सोसायटीला मालक म्हणून खरेदी खत करून दिलेली नव्हती. त्यामुळे हे प्रकरण ग्राहक न्यायालयात उभेच राहू शकले नाही.
सोसायटी किंवा निवासी इमारतीमध्ये केवळ फ्लॅटची मालकी असून उपयोग नाही, तर त्या जमिनी चा मालकी हक्क आपणाकडे असायलाच हवा. त्यासाठी जमीन मालकासोबत सोसायटीने ‘कन्व्हेंस डीड’ (खरेदी खत) करणे आवश्यक आहे. 
अनीथा आपण बेघर होऊ शकतो याची सर्व ग्राहकांनी दाखल घ्यावी.
आपणास मोफत मार्गदर्शनासाठी त्वरित संपर्क साधा किंवा अधिक माहिती येथे क्लिक करा 
स्वप्नील कदम 

वकील ,
उच्च न्यायालय
९९२०९६३७३०